राज्य सरकारचा मुंबई महापालिकेला ६४७.३४ कोटींचा पहिला हफ्ता
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई महापालिकेला ६४७.३४ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता दिला आहे.
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई महापालिकेला ६४७.३४ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता दिला आहे. मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पालिका आयुक्तांकडे दिला. जकात बंद झाल्यानं मुंबई महापालिकेला दरवर्षी सात हजार कोटींचं नुकसान अपेक्षित आहे. ते राज्य सरकारच्या तिजोरीतून दरमहा देण्यात येणार आहे. त्याचाच पहिला हप्ता यावेळी देण्यात आला.
जकात रद्द झाल्यामुळे या महापालिकांना मिळणार हफ्ता
मुंबई महापालिका- ६४७.३४ कोटी रुपये
ठाणे महापालिका- ५९.३० कोटी रुपये
नवी मुंबई महापालिका- ७७.९२ कोटी रुपये
पुणे महापालिका- १३७.३० कोटी रुपये
पिंपरी-चिंचवड महापालिका- १२८.९७ कोटी रुपये
नाशिक महापालिका- ७३.४० कोटी रुपये
नागपूर महापालिका- ४२.४४ कोटी रुपये
कल्याण-डोंबिवली महापालिका- १९.९२ कोटी रुपये
उल्हासनगर महापालिका- १२.८५ कोटी रुपये
भिवंडी महापालिका- १८.१० कोटी रुपये
मीरा-भाईंदर महापालिका- १९.५१ कोटी रुपये
जळगाव महापालिका- ८.७८ कोटी रुपये
नांदेड महापालिका- ५.६८ कोटी रुपये
सोलापूर महापालिका- १८.६० कोटी रुपये
कोल्हापूर महापालिका- १०.३५ कोटी रुपये
अहमदनगर महापालिका- ७.१२ कोटी रुपये
औरंगाबाद महापालिका- २०.३० कोटी रुपये
अमरावती महापालिका- ७.८२ कोटी रुपये
चंद्रपूर महापालिका- ४.४९ कोटी रुपये
परभणी महापालिका- १.५४ कोटी रुपये
लातूर महापालिका- १.२५ कोटी रुपये
सांगली महापालिका- १०.९५ कोटी रुपये
मालेगाव महापालिका- ११.६८ कोटी रुपये
धुळे महापालिका- ७.३४ कोटी रुपये
अकोला महापालिका- ५.२९ कोटी रुपये