मुंबई : एसटी महामंडळाचं (ST Strike) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर (ST Emoplyee Agiation at Azad Maidan) एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे  राज्य सरकार जाणीवपूर्वक डोळेझाक करतेय. त्यामुळे कर्मचारी आता आणखी आक्रमक झाले आहेत. आमच्या छातीवर गोळी घातली तरी आम्ही इथून हटणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा संपकरी महिला एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. (state transport empoyee agrresive over to on  issue of merging ST Corporation with the state government at azad maidan mumbai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम


"मागणी रास्त आहे. सर्व सहजासहजी होऊ शकतं. सरकारच्या मनात असलं तर सर्वकाही होऊ शकतं. अशक्य असं काहीच नाही. मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही, मग काहीही होवोत. सरकारकडे दोनच पर्याय आहेत. एकतर विलिनीकरण करावं, किंवा आमच्या  छातीवर गोळ्या घातल्या तरी आम्ही इथून हटणार नाही. जालियनवाला बाग हत्याकांड केलं तरी चालेल आम्ही हटणार नाहीत", असा निर्धार या महिलांनी एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.



अनिल परब यांना साडीचोळी


परिवहनमंत्री अनिल परब यांना साडीचोळी देण्यासाठी निघालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अडवल्यानं आझाद मैदानात काही काळ तणाव निर्माण झाला होता. आझाद मैदानाला सध्या छावणीचं स्वरूप आलं. कामगारांना अडवण्यासाठी मोठा पोलीस बंदोपस्त ठेवण्यात आलाय. 


अनिल परबांच्या घरी जाण्यावर आंदोलक ठाम होते. यावेळी आंदोलकांनी सराकरविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर  पोलिसांच्या विनंतीनंतर परबांना देण्याची साडीचोळी पोलिसांकडे सोपवण्यात आली. एसटी कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीनं पोलीस अधिका-यांकडे ही साडीचोळी पोलीस अधिकाऱ्यांना दिली.