मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर मोठी परिणा दिसून आला. कालही बाजारात निराशी दिसून आली. आज मार्केट ओपन झाले असताना सेन्सेक्समध्ये ३०० अंशांनी घसरण पाहायला मिळाली. आज दुसऱ्या दिवशी  शेअर बाजार गडगडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शेअर बाजारात निफ्टीतही घसरण बघायली मिळाली. अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एल अँड टी, कोटक महिंद्रा आदींच्या शेअरच्या दरात घसरण झाली. 


रिझर्व्ह बँक पुढील आठवड्यात पतधोरण जाहीर करणार आहे. तसेच बजेटमधील घोषणांबाबत काहीसा संभ्रम असल्याने शेअर बाजारात घसरण झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला.
 
तसेच शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३०० अंशांनी खाली घसरला असून निफ्टीदेखील ५० अंशांनी घसरुन १०, ९५० पर्यंत खाली आला. गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना भांडवली बाजारातील व्यवहारातून १ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवर होणाऱ्या लाभावर १० टक्के कर प्रस्तावित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बाजारात निरुत्साह दिसून आला.


पुढील आर्थिक वर्ष म्हणजेच २०१८ - १९ मध्ये वित्तीय तूट ३.३ टक्के इतकी राहील, असे जेटलींनी सांगितले. यापूर्वी २०१८- १९ वित्तीय तूट ३.२ टक्के इतकी राहील, असा अंदाज होता. या शिवाय सिंगापूर व आशियातील अन्य शेअर मार्केटमध्ये झालेली घसरण, याचा परिणाम शुक्रवारी शेअर बाजारावर दिसून आला.