....असं झालं तर राज्यात पुन्हा LockDown, आरोग्यमंत्र्यांचा सूट देताना इशारा
आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी निर्बंधातून सूट देताना इशाराही दिलाय.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : ठाकरे सरकारने राज्यातील जनतेसह विविध घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात आता रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल्स सुरु राहणार आहेत. त्यामुळे हॉटेलचालकांना मोठा दिलासा मिळालाय. तसेच यासह विवाह सोहळ्यााला 50 पेक्षा अधिकांना उपस्थित राहता येणार आहे. जीम्स आणि मॉल्सही सुरु होणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र निर्बंधातून सूट देताना टोपेंनी जनतेला कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहन केलंय. तसेच तिसऱ्या लाटेत जर राज्याला ठराविक मर्यादेपेक्षा ऑक्सीजन अधिक लागला, तर पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केला जाईल, अशा इशाराही टोपेंनी दिला. (Strict lockdown will be imposed maharashtra from 700 metric tonnes of oxygen is required in 3rd wave says helth minister rajesh tope)
टोपे काय म्हणाले?
"तिसर्या लाटेत 700 मेट्रीक टन ऑक्सिजनची ज्या दिवशी गरज लागेल, त्या दिवसापासून लगेच राज्यात कडक लॉकडाऊन लागू केला जाईल, असं टोपेंनी पत्रकार परिषदेरम्यान स्पष्ट केलं. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यानंतर टोपेंनी राज्य सरकारच्या वतीने या निर्णयांची घोषणा केली.
15 ऑगस्टपासून 'स्वातंत्र्य'
खुल्या प्रांगणात लग्न सोहळ्याला 200 जणांना उपस्थित राहता येणार आहे. तर हॉलमध्ये क्षमतेच्या 50 टक्के तसेच जास्तीतजास्त 100 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले हवेत. या सर्व नियमांची अंमलबजावणी ही 15 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.