मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या  'स्मार्ट कार्ड' योजनेला  १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, याबाबची घोषणा राज्याचे  परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यामध्ये ३३ टक्के ते १०० टक्के पर्यंत सवलत देण्यात येत आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या  'स्मार्ट कार्ड' काढण्याची योजना एसटीने  यापूर्वीच सुरु केलेली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरु आहे. 


परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने या योजनेला दि. १५ऑगस्ट २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे  ज्या भागात एसटी बस सुरु असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, असेही मंत्री परब यांनी सांगितले.