मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. यावेळी अनेक सेवा सुविधा बंद ठेवण्यात आल्यात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. मात्र, आजही सर्वसामान्यांना लोकल बंद आहे. आता मुंबईत (Mumbai) विद्यार्थ्यांना (Students demand) लोकल प्रवासाची (Mumbai Local ) परवानगी द्या अशी मागणी आता सुरू झाली आहे. कोरोना काळात बंद असलेल्या शाळा, कॉलेजेस आयटीआय हळूहळू सुरू होत आहेत. मुंबई लोकलच्या सुमारे ९० टक्के फेऱ्याही सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, अशी मागणी केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीकरण सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांसाठीची लोकलबंदी हटवण्याची मागणी केली जात आहे. कर्जत कसारा भागातल्या विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी प्रवास करताना हाल होत आहेत. त्यामुळे त्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी केली जात आहे.



लोकलअभावी सुरू असलेल्या सर्वसामान्यांच्या प्रवासयातना काही संपलेली नाही. यात आता विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी घट लक्षात घेता, प्रशासनाने मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्याची मागणी होत आहे. शहरातील लहान-मोठ्या चहाच्या टपऱ्यांपासून मॉल-हॉटेल पुन्हा सुरू झाली आहेत. सरकारी-खासगीसह सर्वच क्षेत्रांमधील दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. यामुळे लोकल सेवा सुरु करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे.