मुंबई : मुंबईत कांदिवलीच्या चारकोप भागातील ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडलीय. शाळा सुरु असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय. पीडित विद्यार्थिनीने सगळा प्रकार शाळेत सांगितला. मात्र त्याबाबत शाळेकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. यानंतर पीडित विद्यार्थिनीने सगळा प्रकार घरी सांगितला.


कारवाईची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित विद्यार्थिनीच्या पालकांसह इतर पालकांनी यानंतर शाळेत गोंधळ घातला. आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशा मागणी यावेळी करण्यात आली.


जवळपास एक तासाच्या गोंधळानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकेने आरोपीवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु आहे.