गणेश कवाडे, झी मीडिया, मुंबई :  ब्रिटनमध्ये असेलली छत्रपती शिवाजी महाराजांची ( Chhatrapati Shivaji Maharaj)  पूजेची जगदंबा तलवार (Jagdamba Sword ) तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शिंदे-फडणवीस  सरकार (Shinde-Fadnavis Government)  प्रयत्न करत आहे. जगदंबा तलवार पाठोपाठ आता शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघ नख परत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.  राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (State Culture Minister Sudhir Mungantiwar) यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाघ नखं पुन्हा मिळावं यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा सुरू असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.  शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी वाघ नखं राज्यात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. 
छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवारीप्रमाणेच ही वाघ नखं देखील इतिहासाची साक्षिदार आहे. जगदंबा तलवारी प्रमाणेच ही वाघनंख देखील सध्या ब्रिटनमध्ये आहेत.


महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असलेली ही शस्त्र भारतात आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार विशेष प्रयत्न करत आहे. शिवराज्यभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याआधी ही शस्त्र महाराष्ट्रात परत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.