कोल्हापूर : ऊसदराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत कोल्हापुरात सुरु असलेली बैठक फिस्कटली. FRPचे तुकडे करण्याच्या कारणावरुन साखऱ कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद झाल्यानं या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ नोव्हेंबरला होणाऱ्या स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताही साखर कारखाना सुरु करु देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय. 


दरम्यान शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदे नंतर पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांच्यात बैठक होईल असं कारखानदारांनी म्हटलं आहे. तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात संघर्षाची वेळ येणार नसल्याचा दावा सतेज पाटलांनी केलं आहे.