फक्त १ लाख रूपयांचंच कर्ज माफ होणार-चंद्रकांत पाटील
नियमित कर्ज भरणाऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करू असं देखील आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
मुंबई : शेतकऱ्यांचं फक्त १ लाख रूपयांचंच कर्जच माफ होणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करू असं देखील आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
तसेच ३० जून २०१६ पर्यंतचेच थकीत कर्जमाफ होणार, या कर्जाची मर्यादा देखील १ लाख असेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
मात्र सरकारने जारी केलेले निकष हे शेतकऱ्यांचा अपमान करणारे आहेत, अपमानस्पद आहेत, असं शेतकरी नेत्यांनी म्हटलं आहे. ते आम्हाला मान्य नाहीत असं म्हणून सुकाणू समितीने सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावत, सह्याद्री अतिथिगृहाबाहेर घोषणाबाजी केली.