Mega block Cancelled: रविवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडून रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण रविवारच्या प्रवासाआधी तुम्हाला रेल्वेच्या वेळापत्रकाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कुठे मेगाब्लॉक आहे आणि कुठे मेगाब्लॉक रद्द झालाय? त्यानुसार कोणत्या वेळेत प्रवास करायचा? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारच्या मेगा ब्लॉकसंदर्भात महत्वाची अपडेट आहे. यावेळच्या रविवारी मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा दिला जाणार आहे. या मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वेने मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल, याची प्रवाशांनी नोंद घ्या. रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. 


रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल याची प्रवाशांनी नोंद घ्या. प्रवाशांनी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत प्रवास करणे टाळावे. 


काळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत या पाच तासांच्या ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्यावतीने देण्यात आली आहे.


मध्य रेल्वेमध्ये बंपर भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज


मध्य रेल्वेअंतर्गत महाराष्ट्रात ही भरती सुरु आहे. या भरतीअंतर्गत एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. खेळाडू ग्रुप सीच्या एकूण 21 जागा आणि खेळाडू ग्रुप डीच्या एकूण 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी/ आयटीआय/बारावी/पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने संबंधित क्रीडा पात्रता पूर्ण केलेली असावी. मध्य रेल्वेच्या खेळाडू ग्रुप सी आणि खेळाडू ग्रुप डीच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25 वर्षेांदरम्यान असावे. एससी/एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सवलत देण्यात येणार आहे. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात नोकरी करता येणार आहे. अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी उमेदवारांकडून 500 रुपये शुल्क घेण्यात येईल. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/एक्स सर्व्हिसमन/महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 5 हजार 200 ते 20 हजार 200 रुपये पगार दिला जाणार आहे. इच्छुक उमेदवार आपला अर्ज 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत पाठवू शकतात. मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट cr.indianrailways.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.