मुंबई : सुशांतसिंग राजपूत मृत्यूनंतर ड्र्ग्ज कनेक्शनची चौकशी नाक्टोकीक्स ब्युरोकडून सुरु आहे. सध्या नार्कोटीक्सची टीम रिया चक्रवर्तीच्या घरी पोहोचली आहे. मुंबई पोलिसांची टीम देखील इथे दाखल झालीयं. याआधी सुशांतचा नोकर दीपेश सावंतला एनसीबीने अटक केलीय. त्याला सरकारी पुरावा म्हणून कोर्टात सादर केलं जाणारेय. दरम्यान रियाच्या आज होणाऱ्या चौकशीत खालील २० प्रश्न एनसीबीतर्फे रियाला विचारले जाण्याची शक्यता आहे.


संभाव्य प्रश्न 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) व्हॉट्सएप चॅटमध्ये तू स्वत: होतीस का ? जर हो तर कोणासोबत ड्रग्जसंदर्भात चॅट केलं होतं ?


२) तू स्वत:देखील ड्र्ग्ज घेतेस का ? जर हो तर कोणते ड्रग्ज घेते ?


३) तू कोणासाठी ड्रग्ज मागवायची ?


४) तू कोणाच्या माध्यमातून ड्रग्ज मागवायची ?


५) पैसे कोण द्यायचं ? आणि कशाप्रकारे द्यायचे ?


६)१७ मार्चला शौविकसोबतच्या चॅटमध्ये कोणासाठी मोठी मागणी होत होती ?


७) पहिल्यांदा कधी आणि कोणती ड्रग्ज घेतली ?


८) भाऊ शौविक तुझ्या सांगण्यावरुन ड्रग्ज आणायचा का ? त्याच्या संपर्कात येऊन तू ड्रग्ज घ्यायला लागली का ?


९)सुशांत ड्रग्ज घेतो हे तुला कधी समजलं ?


१०) सुशांत ड्रग्ज घेत होता असेल तर तू त्याला रोखलं का नाहीस ?


११) सुशांत स्वत: देखील ड्रग्ज मागवायचा का ?


१२) ड्रग्ज घ्यायची सवय लागलीय आणि कशी लागलीय असं सुशांतने कधी सांगितलं का ?


१३) सुशांतची तब्येत ठिक नाही माहिती होतं तर ड्रग्ज घेण्यापासून रोखलं का नाही ?


१४)तू ड्रग्जच्या माध्यमातून पैसे कमावत होतीस का ?


१५) ड्रग्ज खरेदी करण्यासाठी कोणाच्या पैशांचा वापर व्हायचा ?


१६) बॉलिवूडमध्ये कोण आहेत जे पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवतात ?


१७) तुझ्या भावाने अनेकांची नाव सांगितली. तुझ्या तोंडून ऐकायची आहेत.


१८) सॅम्युअल मिरांडाच्या माध्यमातून तू ड्रग्ज मागवले की शौविकच्या माध्यमातून मागवले ?


१९)तू, सुशांत आणि शौविक ड्रग्ज घ्यायचात हे कोणाकोणाला माहिती होतं ?


२०) तू कधी दीपेश सावंतच्या माध्यमातून ड्रग्ज मागवले का ?


अटकसत्र सुरुच 


या प्रकरणात मोठ्या माशाचा शोध सुरुयं. सुशांतच्या कथित मृत्यू प्रकरणी अटक सत्र सुरु झालंय. केसशी संबंधित ड्रग्ज कनेक्शचा तपास सुरु असल्याचे  नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या डेप्युटी डीजींनी सांगितले. एनसीबीने शनिवारी रात्री उशीरा नोकर दीपेश सावंतच्या रुपात ८ वी अटक केली. 



सरकारी पुरावा 


एनसीबीकडून दीपेशला सरकारी पुरावा म्हणून सादर करण्यात येणारेय. दीपेश सावंत माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. दीपेश या प्रकरणात जी काही माहिती देईल ती महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. 


यापूर्वी सुशांत प्रकरणात चौकशी सुरु असताना, एनसीबीने शुक्रवारी अब्बास, करण, जैद, बासित आणि कैजान अशा 5 जणांना अटक केली होती. त्यापैकी अब्बास आणि करणला काही वेळातच जामीन मिळाला होता. तर कैजानला शनिवारी जामीन मिळाला आहे. त्याशिवाय एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मित्र सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेतलं आहे. 


सीबीआय टीम पुन्हा एकदा सुशांतच्या वांद्रेतल्या घरी चौकशीसाठी गेले होते. यावेळी सीबीआय टीमसोबत सुशांतची बहीण मितू सिंहही सुशांतच्या फ्लॅटवर हजर होती. नीरज, केशव, सिद्धार्थ पिठाणीही यावेळी फ्लॅटवर हजर होते. सीबीआयने पुन्हा एकदा १४ जूनच्या त्या दिवसाबाबत मितू आणि घरातल्या सदस्यांची चौकशी केली असून १४ जूनच्या दिवसाचं रिक्रिएशन केले आणि सीबीआय टीम निघून गेली.