मुंबई : सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याच्या बातमीने सर्वांना हादरवून टाकले आहे. पटनाचा राहणारा 34 वर्षीय सुशांत बऱ्याच दिवसांपासून त्रास सहन करत होता आणि डिप्रेशनवर उपचार घेत होता. त्यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुशांतच्या बहिणीने देखील काही माहिती दिल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या मृत्यूचे गूढ सोडविण्यात गुंतले आहेत. पोलिसांनी सुशांतच्या बहिणीशी या संदर्भात चौकशी केली. ज्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. बहिणीने पोलिसांना सांगितले की, सुशांतला आर्थिकदृष्ट्या कोणतीही अडचण नव्हती. आर्थिकदृष्ट्या सर्व काही ठीक होते. पण गेल्या आठवड्यापासून सुशांतची प्रकृती ठीक नव्हती.


बहिणीने सांगितले की, ती सुशांतला त्याच्या वांद्रे फ्लॅटवरही भेटायला गेली होती. सुशांतच्या नैराश्याबद्दल तिला माहिती असल्याचेही तिने उघड केले. पण सुशांत इतके मोठे आणि भयानक पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं. बहिणीच्या म्हणण्यानुसार, सुशांत अत्यंत सामान्यपणे बोलायचा.


अधिक वाचा: काय आहे डिप्रेशन आणि त्याची लक्षणं, ज्यामुळे येतात आत्महत्येचे विचार


सुशांत सिंह राजपूत गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनवर उपचार घेत होता. तो क्लिनिकल डिप्रेशनचा बळी होता. मात्र, पोलिसांना अद्याप याची खातरजमा करायची आहे.


सुशांतच्या मॅनेजरला त्याचा फोनचा पासवर्ड माहित होता, ज्याच्या मदतीने पोलिसांना कळले की त्याने त्याचा मित्र महेश कृष्णा शेट्टीला शेवटचा फोन केला होता. यानंतर त्याने आपल्या बहिणीला फोन केला होता. महेशने सुशांतला पुन्हा कॉल केला होता. पण तोपर्यंत उशीर झाला होता. सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.


या प्रकरणातील तपासाची मार्ग सुशांतचा फोन आहे. पोलीस त्याचे फोन रेकॉर्ड तपासत आहेत. पोलीस सध्या सुशांतचे मित्र आणि नातेवाईकांवर लक्ष केंद्रित करत असून त्यांची चौकशी करतील.