मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील संदीप सिंह याला वाचवण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरु आहे, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. दरम्यान, विनाकारण भाजपला या प्रकरणात ओढू नका, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सुशांतसिंह राजपूत प्रकरणात भाजपवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी नवीन आरोप केले आहेत. संदीप सिंहच्या भाजप कनेक्शनच्या चौकशीची मागणी त्यांनी लावून धरली आहे. सुशांतसिंह प्रकरणात संदीप सिंह चौकशीच्या रडारवर असताना तो लंडनला पळून जाऊ शकतो, असे रिपोर्ट्स असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. 



संदीप सिंहला वाचवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. काँग्रेसच्या आरोपांना भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. विनाकारण या प्रकरणात भाजपला ओढू नका असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.