Sushma Andhare on Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या मुंबईतील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. दरम्यान आता सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीचं पत्र राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लिहिलंय. तर याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी निषेध व्यक्त करत भाजपच्या महिला नेत्यांचे कान टोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुषमा अंधारे यासंदर्भात बोलताना म्हणाला, "अब्दुल सत्तारांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतात हे पाहणं गरजेचं आहे. कारण फडणवीस हे सातत्याने महिलांचं अवमान करणारं, महिलांची बदनामी करणारं, महिलांचं खच्चीकरण करणारी जी वक्तव्य येतात अशांना पाठीशी घालतात. भाजपच्या सो कॉल महिला नेत्या आहेत त्या आता दातखिळी लावून का बसल्यात, याचं मला आश्चर्य आहे."


"या महिला नेत्या आता का काहीच बोलत नाहीयेत? की या नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की, मी जेव्हा सांगेन तेव्हाचं बोलायचं? रिमोट कंट्रोल आहे का देवेंद्र फडणवीस यांच्या हातात?," अशा कडक शब्दात सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर तोफ डागलीये.


अंधारे म्हणाल्या, "अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेलं वक्तव्य हे दुर्देवी आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अब्दुल सत्तारांवर कारवाई झाली पाहिजे. अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आग्रही आहे."


सत्तार नक्की काय म्हणाले?


मराठवाड्यातील सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडणार होती. या सभेच्या नियोजनाची जबाबदारी सत्तारांकडे होती.  याआधी सत्तारांवर सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. सत्तारांना 50 खोके मिळाले का, असा प्रश्न सुळेंनी केला होचा. या टीकेबाबत उत्तर देताना सत्तारांचे जीभ घसरली. "तुम्हालाही 50 खोके द्यायचे का?" तसेच इतकी भिकार@# झाली असेल तर तिलाही देऊ", अशा एकेरी भाषेत म्हणत गलिच्छ शब्दात सत्त्तारांनी टीका केली.