मुंबई : एसटी महामंडळाचं (Maharashtra State road transport Corporation) राज्य सरकारमध्ये (Maharashtra State Government) विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Strike) संप सुरु आहे. परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांनी पुन्हा रुजु व्हावे, यासाठी सेवाज्येष्ठतेनुसार वेतनवाढही दिली. मात्र त्यानंतरही काही कर्मचारी हे विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. (Suspension of female ST conductor sarita kodere lad in Latur finally back)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचाऱ्यांच्या या आग्रही आणि ठाम भूमिकेमुळे महामडंळाने निलबंनात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. यात निलंबनामध्ये महामंडळाच्या गलथान कारभार समोर आला आहे. महामंडळाने चक्क प्रसूती रजेवर असलेल्या महिला कंडक्टरचं निलंबन केलं. अखेर झी 24 तासने बातमी दिल्यानंतर महिला कंडक्टरचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे.



नक्की काय झालं? 


लातूरमधील एसटी कंडक्टर सारिका कोद्रे-लाड या गेल्या काही दिवसांपासून प्रसूती रजेवर होत्या. या दरम्यान महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यास सुरुवात केली. यामध्ये सारिका यांच्यावरही निलंबनात्मक कारवाई करण्यात आली. हा सर्व प्रकार झी 24 तासने समोर आणला. त्यानतंर अखेर महामंडळाने निलंबन मागे घेतलं. आहे. 


महामंडळाचं स्पष्टीकरण
 
सारिका कोद्रे-लाड यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई ही नजरचुकीने करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण हे महामंडळाने दिलं आहे.