मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पासाठी फोर्ट भागात भुयार खोदण्यास मुंबई हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुयार खोदल्यामुळे हेरिटेज इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो, असं निरीक्षण नोंदवत ही स्थगिती आणलीय. या संदर्भातली याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. 


मेट्रो - ३ मुळे फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतींना धोका असल्याचा दावा करत 'जे एन पेटीट' या संस्थेनं हायकोर्टात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना आयआयटी मुंबईकडून हायकोर्टाच्या इमारतीची मेट्रो - ३ च्या संदर्भात पाहणी करण्यात येईल, असं हायकोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं. मात्र, लोकांनी उगाच विरोधाला विरोध करू नये असा सल्लाही कोर्टानं दिला होता.