चोरीचा पुरावा नष्ट करण्यासाठी गिळला लाखो रुपयांचा पुष्कराज खडा
चोराने चक्क खडा गिळला
मुंबई : चोरी पकडली गेली म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी एकाने चक्क लाखो रुपये किमतीचा पुष्कराज खडा गिळण्याची घटना मुलुंड मध्ये समोर आली आहे. एमजी रोडवर स्वर्णप्रभा ज्वेलर्समध्ये मोहम्मद हुसेन हा चोरीच्या उद्देशाने गेला होता. कर्मचाऱ्याला पुष्कराज खडा दाखविण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांची नजर चुकवून त्याने तो खडा आपल्या हातात घेऊन दुकानाबाहेर पळ काढला.
कर्मचाऱ्यांच्या हे निदर्शनास आल्यावर त्यांनी त्याचा पाठलाग करत गाठलं. पण मोहम्मद याने पुरावा नष्ट करण्यासाठी चक्क तो खडा गिळून टाकला. वैद्यकीय तपासणीत त्याने खडा गिळला असल्याचं निष्पन्न झालं असून जे जे रुग्णालयात यी आरोपीला दाखल करण्यात आलं आहे.
चोरीच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या असतील. पण अशा घटना या अनेकांना धक्का देणाऱ्या असतात. चोरांने आपली चोरी लपवण्यासाठी जीवाशी खेळ केला.