मुंबई : या वर्षी स्वाइन फ्लूचा प्रार्दुभाव वाढल्याचा दिसून येत आहे. जानेवारी ते जून २०१७ पर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात स्वाइन फ्लूचे १५ रुग्णांवर मृत्यू ओढावला आहे. १३ ते २२ जूनपर्यंत तीन रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे जीव गमावल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेच्या साथ रोग नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात मागील महिन्यांच्या तुलनेत अधिक स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे फ्लू विषाणूच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले त्यामुळे स्वाइन फ्लूचा आजार वाढत असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 


मुंबई महापालिकेकडून धारावीत करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात ४ रुग्णांना स्वाईन फ्लूची लक्षणे आढळून आली. मालवणी परिसरात २४६९ लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले तेव्हा केवळ एका व्यक्तीमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे आढळली तेव्हा त्यांच्यावर पुढील उपचार सुरु केले आहेत.