मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी भाजपने केली आहे. यासाठी भाजपचं शिष्टमंडळ मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियामध्ये अश्लिल आणि आक्षेपार्ह भाषा वापरली जात आहे. बदनामीकारक पोस्ट टाकून फडणवीस आणि भाजप कार्यकर्त्यांना धमकी दिली जात आहे. अश्लिल पद्धतीने ट्रोलिंग करणाऱ्यांवर आणि सोशल मीडियावर गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी भाजपने केली आहे.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. हे निवेदन देण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर, आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.



दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या भेटीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. ट्रोल्सच्या जनकांना आज ट्रोलविरोधात तक्रार करण्याची वेळ येणे हा नियतीचा खेळ आहे. बोया पेड बबूल का, आम कहांसे खाय? २०१४नंतर देशात ट्रोलधाड भाजपने आणली. आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं, अजून धर्मांधता भाजप ट्रोल्स पसरवतात, तरीही शिवीगाळ, धमक्या येत असतील, तर पोलिसांनी कारवाई करावी, असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.