मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर चेंबूरजवळ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या बसला भीषण अपघात झालाय. या अपघातात ११ विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. कुलाब्याहून निघालेली ही बस ट्रॉम्बे परिसरातल्या भाभा अणूसंशोधन केंद्राकडे निघाली होती. रात्री दहाच्या सुमारास चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दुभाजकावर धडकली. जखमी विद्यार्थ्यांना तातीडीनं शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातात बसचा चालकही गंभीर जखमी झाला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.