Mumbai Police : ट्रॅफिक पोलिसांची टॅक्सी-ऑटोचालकांवर करडी नजर, भाडे नाकारल्यास...
Mumbai Traffic Police : जर टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी भाडं नाकारलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
Taxi And Auto Drivers : अनेक वेळा आपल्या सगळ्यांना हा अनुभव आला असेल की, जवळच्या अंतरावर (Short Rides) टॅक्सी (Taxi) आणि ऑटोचालक (Auto Drivers)भाडे नाकारतात. पण आता मुंबईकरांसाठी (Mumbaikar Good News) आनंदाची बातमी आहे. कारण मुंबई ट्रॅफिक पोलिसांची (Mumbai Traffic Police) अशा टॅक्सी-ऑटोचालकांवर करडी नजर असणार आहे. शॉर्ट राइड्स टाळणे टॅक्सी, ऑटोचालकांना महागात पडणार आहे.
भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी-ऑटोचालकांवर बसणार चाप
मुंबईत जर टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी भाडं नाकारलं (refuse fares) तर त्यांच्यावर कारवाई (Action) करण्यात येणार आहे. टॅक्सी आणि रिक्षावाले भाडं नाकारत असल्याच्या घटना मुंबईकरांना रोजच्या आहेत. पण आता या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस या मुजोर चालकांवर कारवाई करणार आहे. तसं अधिकार प्रभारी पोलीस निरिक्षकांना देण्यात आले आहे. यासंदर्भात रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉबाहेर दर्शनी भागात फलक लावण्यात आले आहेत. (taxi and auto refuse fares Mumbai Police nmp)
भाडे नाकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरुद्ध मोटर वाहन कायदा कलम 178(3)अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्या यापुढे रिक्षाचालक आणि टॅक्सीचालक प्रवाशांसोबत अरेरावी करत भाडे नाकारता येणार नाही आहे.