YouTuber CCTV Video Viral : सुरक्षेसाठी अनेकजणं आपल्या दुकानात, कार्यालयात सीसीटीव्ही (CCTV) लावतात. इतकंच काय तर घरातील सुरक्षेसाठीही अनेकजण सीसीटीव्ही लावतात. पण खरबरदारी घेतली नाही तर हे चांगलंच महागत पडू शकतं. असंच एक प्रकरण मुंबईतून समोर आलं आहे. मुंबईतल्या वांद्रे इथे राहाणाऱ्या एका युट्यूबरने घरातले खासगी व्हिडिओ लीक झाल्याची तक्रार दाखल केली. 21 वर्षांच्या या  YouTuber ने आपल्या घरात सीसीटीव्ही लावले होते. हॅकरने त्याच्या घरातील सीसीटीव्ही हॅक करुन त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 नोव्हेंबरला या युट्यूबरच्या घरातील CCTV कोणीतरी हॅक केला. पोलिसांनी या प्रकरणी IT कायद्याअंतर्गत गुन्हा तक्रार दाकल करुन घेतली आहे. हे प्रकरण सायबर पोलीसांकडे वर्ग करण्यात आलं असून सायबर पोलिसांनी सीसीटीव्ही सिस्टम हॅक करणाऱ्या IP अॅड्रेस शोघून काढला आहे. तसंच ज्या सोशल साईटवर हे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, त्या साईटसना हे व्हिडिओ डिलेट करण्याच्या सूचना केल्या आहेत. 


काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुंबईत राहाणाऱ्या युट्यूबरने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घरात CCTV लावले होते. यातला एक कॅमेरा त्याने आपल्या बेडरुमध्येही इन्स्टॉल केला होता. 9 डिसेंबरला त्याच्या एका मित्राचा फोन आला आणि त्याने तुझे कपडे बदलतानाचे Nude व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं सांगितलं. इतकंच काय तर त्याच्या आई-बहिणीचे प्रायव्हेट व्हिडिओही लीक करण्यात आले आहेत. हे एकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. युट्यूबरने जेव्हा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा तो आपल्याच बेडरुमचं असल्याचं त्याला कळलं. हा व्हिडिओ सोशल मिडियावर इतका व्हायरल झाल होता की त्याला अनेक मित्रांचे, नातेवाईकांचे फोन आले. पोलिासांच्या मते हे काम त्याच्या ओळखीतल्या कोणाचं तरी असावं, त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. 


सीसीटीव्ही कसा हॅक होतो?
सीसीटीव्ही हा वायफायशी कनेक्ट केला जातो. म्हणजे तुमच्या घरी लागलेले सीसीटीव्ही इंटरनेटशी जोडलेले असतात. घरातल्या इंटरनेटसाठी  Wi-Fi चा वापर केला जातो. अशात  Wi-Fi चा पासवर्ड कोणाच्या हाती लागल्यास सीसीटीव्ही हॅक करणं अगदी सोप होतं. CCTV साठी कमकूवत पासवर्डही धोकादायक ठरू शकतो. हॅकर्स असे पासवर्ड सहज हॅक करु शकतात. किंवा त्या व्यक्तीच्या ओळखीतलेही पासवर्डचा गैरवापर करु शकतात. 


याशिवाय एखाद्या फेक लिंकवर क्लिक केलं असल्यास किंवा एखादी संशयीत फाईल डाऊनलोड केली असल्यास या माध्यमातूनही हॅकर्स सीसीटीव्ही हॅक करु शकतात.