`महाराष्ट्रात लिडर नाही डीलर, मोदी खोटारडेपणाची फॅक्टरी`; शिवतीर्थावरून तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल!
Bharat JodoNyay Yatra : ठाकरेंच्या शिवतिर्थावरून इंडिया आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेने होणार आहे. अशातच शिवाजी पार्कवर बोलताना तेजस्वी यादव यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
Tejaswi Yadav At INDIA Alliance Rally : ठाकरेंच्या शिवतिर्थावरून इंडिया आघाडीने प्रचाराचा (INDIA Alliance Rally) नारळ फोडला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat JodoNyay Yatra) समारोप शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेने होणार आहे. देशातील दिग्ग्ज नेत्यांनी मंजावर हजेरी लावली अन् भाजपविरुद्ध एल्गार केला. शिवाजी पार्कवर बोलताना तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी जोरदार भाषण केलं अन् भाजपवर हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.
काय म्हणाले तेजस्वी यादव?
महाराष्ट्रात लिडर नाहीत तर डीलर आहेत. घाबरलेलले लोक गेले त्याने काही फरक पडत नाही, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात फक्त आमदार पळवून नेलंय, पण बिहारमध्ये आमच्या चाचाला पळवून नेलंय. माझे काका पुन्हा पलटणार नाहीत याची मोदींनी गॅरंटी द्यावी, असा घणाघात तेजस्वी यादव यांनी केला. भाजपच्या लोकांना शेण पण हलवा म्हणून खायला घालतात. मोदी म्हणजे खोटारडेपणाची फॅक्टरी असल्याची टीका तेजस्वी यादव यांनी केली.
आम्ही राहुल गांधींचे आभार मानतो की त्यांनी देशभर प्रवास केला आणि आजच्या काळात अतिशय महत्त्वाचा संदेश देण्याचे काम केले. आज एकीकडे द्वेष पसरवला जात आहे, जिथे संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. दुसरीकडे राहुल गांधींनी सर्व लोकांना एकत्र करण्यासाठी, संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी, द्वेषाचा पराभव करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली. मी त्यांचे आभार मानतो, असंही तेजस्वी यादव म्हणाले.
शिवतीर्थावर पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं. त्यानंतर सर्वांनी मंचावर आपली उपस्थिती दर्शवत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन यांच्यासह इंडिया आघाडीचे 15 हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
इंडिया आघाडीच्या सभेला समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव गैरहजर राहिले. त्यांनी एक निवदेन जारी करत आपल्या गैरहजरीचे कारण सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये बुधवार, 20 मार्चपासून नामंकनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे मी मुंबईत मी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.