Mumbai news: आतंकवादी शस्त्रांसह घुसलेत...; मुंबई पोलिसांना आलेल्या फोनमुळे एकच खळबळ
Mumbai Police Control received a threatening call: पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, मुंबईत काही आतंकवादी घुसले आहेत. इतकंच नाही तर या दशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Mumbai Police Control received a threatening call: मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, मुंबईत काही आतंकवादी घुसले आहेत. इतकंच नाही तर या दशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र एकंदरीत पोलिसांनी तपासणी केली असता पोलीस कंट्रोल रूमला आलेला हा फोन फर्जी असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांकडून एकाला अटक
पोलीस कंट्रोल रूमला आलेल्या फोननुसार, मुंबईतील डोंगरी भागात काही आतंकवादी घुसले असल्याचं सांगितलं. मात्र पोलिसांनी यासंदर्भात तपासणी केली असता, फोनवरून दिलेली माहिती खोटी असल्याचं समोर आलं. दरम्यान या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात यापूर्वीही असे अनेक बनावट फोन कॉल्स आले आहेत. गेल्या आठवड्यातच, पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता. या कॉलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कुलाब्यातील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये 10-11 सशस्त्र पाकिस्तानी घुसल्याचा दावा करण्यात आला होता.
या निनावी कॉलचं गांभीर्य लक्षात घेता कुलाबा पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह हॉटेलची कसून झडती घेतली. मात्र त्यावेळीही कोणताही पुरावा सापडला नाही. यानंतर फोन कॉल निव्वळ अफवा असल्याचं घोषित करण्यात आलं होतं.
त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल आल्यानंतर यासंदर्भातील संपूर्ण माहिती कुलाबा पोलीस स्टेशनला देण्यात आली. स्थानिक पोलिसांनी त्यांची ओळख शाखा, दहशतवादविरोधी सेल (एटीसी) आणि बीट मार्शल्ससह हॉटेलच्या सुरक्षा प्रमुखांशी संपर्क साधला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने परिसराची झडती घेतली. मात्र आम्हाला काहीही संशयास्पद आढळले नाही.
मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अशा प्रकरणांमध्ये पोलीस प्रत्येक क्षणी अलर्ट मोडवर असतात. त्यावेळीही पाकिस्तानातून काही दहशतवादी समुद्रच्या मार्गाने मुंबईत घुसले होते. त्यावेळी त्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी गोळीबार केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 170 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून 300 हून अधिक लोक जखमी झाले होते.