मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पेक्षा मोठा स्टार नाही. त्यामुळे काही सिनेमांच्या रिलिज डेट्स पुढे ढकलल्या जात असतील तर हरकत नाही, या शब्दात अभिनेता आमिर खान याने ठाकरे सिनेमावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाकरे सिनेमा प्रत्येकालाच पाहायचा असेल त्यामुळे इतर सिनेमांच्या रिलिज तारखा  पुढे गेल्या तर त्यात काही नवीन नाही, असंही आमिर म्हणाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या २५ जानेवारीला बॉक्स ऑफीसवर 'ठाकरे' विरुद्ध 'मणिकर्णिका' सामना रंगणार आहे. या दिवशी तीन चित्रपटांचं प्रदर्शन होणार होते. मात्र,  इम्रान हाश्मीच्या 'चिट इंडिया'ने एक पाऊल मागे घेत प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. आता हा चित्रपट एक आठवडा आधीच प्रदर्शित होणार आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित बायोपीक असलेला सिनेमा सातत्याने चर्चेत आहे. आता, या चित्रपटामुळे इतर चित्रपटांना त्यांच्या रिलीज तारखा जाहीर करण्यास उशिर होत आहे. अभिनेता इम्रान हाश्मीने आपल्या चित्रपटाची रिलीज तारीख बदलली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सिनेमा प्रदर्शित होत असताना अन्य सिनेमा रिलीज करु नये, असे आवाहन केलेय. मात्र, कोणी ऐकले नाही तर तसा इशाराही दिला आहे. 


मात्र 'मणिकर्णिका'च्या २५च्या प्रदर्शनावर कंगना रनौत ठाम आहे. त्यामुळे आता ठाकरे चित्रपटाला झाशीच्या राणीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, चिट इंडियाची तारीख बदलण्याबाबत आमिर खानला विचारले असता त्याने मार्मिक उत्तर दिले आहे. बाळासाहेबांपेक्षा मोठा स्टार नाही. त्यामुळे एखाद्या चित्रपटाला प्रदर्शनाची तारीख बदलावी लागली, तर हरकत नाही, असे आमिर म्हणाला.