ठाणे : अवजड मालवाहतुकीसाठी सोयीची मार्गिका असलेल्या मुंब्रा बायपासवरील उड्डाणपुलाला पडलेल्या भगदाडाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलं आहे. अवजड मालवाहतुकीसह चालकांचीही सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलली. या मार्गावर २४ तासांच्या आत ४ × ४ आकाराची लोखंडी प्लेट बसविण्यात येणार असल्याचं समजत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


त्यामुळे या भगदाडासह या मार्गातले इतर खड्डे कधी बुजवणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. यापूर्वी हा उड्डाणपूल दुरूस्त करण्यात आला होता. परंतु अता सध्या परिस्थिती जैसी थी असंच वास्तव दिसत आहे. कमी दर्जेच्या साधनांचा वापर करून उड्डाणपुलाची दुरूस्ती करण्यात आली होती. असं संतापजनक वक्तव्य प्रवाश्यांकडून करण्यात येत आहे. 


त्याचप्रमाणे या उड्डानपूलावर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत दिवसागणित वाढ होत आहे. शिवाय हा उड्डाणपू सहा महिन्यापासून बंद असल्याची माहिती देखील समोर येत आहे.