Mumbai Local Mega Block Updates: मुंबई लोकलनं दर दिवशी मोठ्या संख्यनं नागरिक प्रवास करतात. शहरातील नागरिकांसोबतच या शहरात नव्यानं येऊन प्रवास करणाऱ्यांचा आकडाही इथं मोठा आहे. अशा या शहरातील काही स्थानकांवरून होणारी प्रवाशांची ये-जा सध्या इतकी वाढली आहे की, इथं जागेची कमतरता प्रकर्षानं जाणवू लागली आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानक हे त्यापैकीच एक. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे रेल्वे स्थानकावरून दर दिवशी मुख्य आणि उपनगरीय रेल्वेनं जवळपास  80 लाख प्रवासी ये- जा करतात. दादरमागोमाग गर्दीचं स्थानक म्हणून ठाण्याचा क्रमांक येतो. कल्याण, कर्जतपासून अगदी नवी मुंबईपर्यंत आणि दक्षिण मुंबई रोखानंही इथून बरेचजण प्रवास करतात. यामध्ये जलद मार्गानं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. अशा या ठाणे रेल्वे स्थानकावर सातत्यानं होणारी गर्दी पाहता ही गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं आता येथील फलाट क्रमांक (प्लॅटफॉर्म 5) 5 ची लांबी वाढवण्याऐवजी रुंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 


हेसुद्धा वाचा : Mhada Lottery 2024 : सर्वसामान्यांना मुंबईत मोक्याच्या ठिकाणी खरेदी करता येणार 2 BHK फ्लॅट 


सदर रुंदीकरणासाठीच्या हालचालींना आता वेग आला असून, चालू महिन्यापर्यंत हे काम सुरु होण्याची शक्यता असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5 वर मोठी गर्दी असल्या कारणानं हे काम दोन ते  तीन दिवसांच्या सुट्टीच्याच कालावधीत पूर्ण करण्याचं नियोजन प्रशासनानं केलं असून, या प्रक्रियेमध्ये रेल्वे रुळ काही अंतर पुढे सरकवले दाऊ शकतात. दरम्यान, हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ 'ब्लॉक' घ्यावा लागू शकतो असंही म्हटलं जात आहे. त्यामुळं प्रवाशांना आता काही काळासाठी या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान या कामानंतर मात्र फलाट क्रमांक 6 वरील गर्दीसुद्धा नियंत्रणात येईल असं म्हटलं जात आहे.