मुंबई : मुंबईत झालेल्या एका बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई येथील साकीनाका परिसरात 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री ही घटना घडली होती. आरोपीने एका मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केली होती.   ही घटना येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली होती.


आरोपी नराधम मोहन चौहान याने 'त्या' मुलीची हत्या करून तिला जखमी अवस्थेत तिला तसेच सोडले होते. त्या मुलीला जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही 11 सप्टेंबर रोजी पीडितेने आपले प्राण सोडले होते.


पोलिसांनी मिळालेल्या पुराव्याच्या आधारे अवघ्या काही तासातच नराधम मोहन चौहान याला अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने करत आरोपीविरोधात सर्व पुरावे गोळा केले.


पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या पुरावाच्या आधारे दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपी मोहन चौहान याला बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली.