दीपक भातुसे / नागपूर : मुंबई महापालिकेच्या विभाजनाच्या मुद्यावरून आज हिवाळी अधिवेशनात विधानसभेत गदारोळ झाला. हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे नसिम खान यांनी मुंबईमध्ये ३ महापालिका निर्माण करण्याची केली मागणी केली. यावरुन विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. 


अजित पवार यांचा खान यांना पाठिंबा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचे तुकडे पडू देणार नाही म्हणत भाजप-शिवसेना आक्रमक झाले. राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा खान यांना पाठिंबा दिला. मुंबईचा आवाका पाहता तीन विभाग होणे आवश्यक, असे मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.


मुंबई पालिकेचे तीन भागात विभाजनाची मागणी


सोमवारी मुंबईतील साकीनाक्यात लागलेल्या आग प्रकरणी विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला.. यावेळी मुंबई महापालिकेचे तीन भागात विभाजन करण्याची काँग्रेस आमदार नसीम खान यांनी मागणी केली. मुंबई विस्तारल्यामुळे महापालिका सर्वच विभागांना न्याय देऊ शकत नसल्याने महापालिकेचे तीन विभाग करावेत अशी मागणी नसीम खान यांनी केली.


विधानसभेचं कामकाज दहा मिनिटे तहकूब


या मागणीला आशिष शेलारांनी तीव्र विरोध केला. मुंबईचे विभाजन म्हणजे हुतात्म्यांचा अवमान असल्याचं शेलारांनी म्हटलं तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी नसीम खान यांची बाजू घेत वाढत्या शहरीकरणामुळे विभाजन महत्वाचे असल्याचे म्हटलयं. तर मी मुंबई विभाजनाबद्दल नव्हे तर मुंबईची तीन आयुक्तालय करा अशी मागणी केल्याचं नसीम खान म्हणाले, मात्र मुंबई विभाजनाच्या मुद्द्यावर जोरदार गोंधळ झाल्याने विधानसभेचं कामकाज दहा मिनिटे तहकूब करण्यात आलं.