मुंबई : कोणाचा होणार मुख्यमंत्री यावरुन शिवसेना-भाजपमध्ये ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री भाजपचाच, असे भाजपच्या काही नेत्यांकडून सांगण्यात येत होते. त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. त्यावरुन शिवसेना-भाजप युतीत खोडा घालू नका, असा टोला शिवसेनकडून लगावण्यात आला होता. त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या विधानावरुन घूमजाव केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष अमित शाहांनी फर्मान काढले. त्यानंतर शिवसेनेतली अस्वस्थता वाढली आहे. शिवसेना १३५ - १३५ जागा लढवतील उरलेल्या १८ जागा मित्रपक्षांना सोडल्या जातील. मित्रपक्षांनी भाजपच्या चिन्हांवर निवडणूक लढवावी, म्हणजे प्रत्यक्ष भाजपाच्या कमळावर १५३ आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर १३५ जागा लढवल्या जातील. म्हणजे जास्त आमदार भाजपचे निवडून आणायचे आणि पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच बनवण्याची रणनिती अमित शाहांनी आखली आहे, असे विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. यावरुन युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मुनगंटीवार यांना नाव न घेता टोला लगावला होता.


'शिवसेना-भाजप युतीत खोडा घालू नका, मुनगंटीवारांना टोला'


 


रुण सरदेसाई यांच्या ट्विटनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घूमजाव केले आहे. शिवसेना-भाजपमध्ये कोणाचा मुख्यमंत्री यावर वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. युतीसंदर्भात अमित शाह आणि उद्धव ठाकरेंमध्ये बोलणी झालेली आहे. त्यानुसार राज्यात २२० पेक्षा जास्त जागा मिळवण्याचे लक्ष्य आहे. पदांबाबत एकत्र बसून चर्चा करू असेही त्यांनी सांगितलंय. 


दरम्यान, शिवसेना-भाजपत प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय शिवसेना उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचे वरूण सरदेसाई यांनी सांगितले. जे नेते या वाटाघाटीला हजर नव्हते त्यांनी आपल्या स्वार्थासाठी युतीत खोडा घालण्याचे काम करू नये, असा टोलाही त्यांनी नाव न घेता मुनगंटीवार यांना लगावला होता.