मुंबईतील `हा` बिल्डर ईडीच्या रडारवर; १३ हजार कोटींची अफरातफर
१३ हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ईडीचा दावा...
मुंबई : डीएचएफएलचा माजी संचालक कपील वाधवान याने तब्बल १२ हजार ७७३ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा दावा अंमलबजावणी संचलनालयाने केला आहे. वाधवाननो डीएचएफलचा पैसा विविध ठिकाणी वळवल्याचा दावाही करण्यात आला आहे.
वाधवानने वेगवेगळ्या बँकांमध्ये तब्बल एक अकाऊंट ओपन करून आणि मुंबईत तब्बल ७९ बोगस कंपन्या स्थापन करून हा पैसा रिचवल्याचं ईडीनं कोर्टात सांगितंलय. याप्रकरणी मुंबईतला आणखी एक मोठा बिल्डरसुद्धा ईडीच्या रडावर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
तर दुसरीकडे, मुद्रालोनच्या नावाखाली कागदपत्रे घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकार पुण्यातील भोरमध्ये घडला आहे. बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन व्यवस्थापक यशवंत बडवे यांनी तरुणांना व्यवसायचे स्वप्न दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय.