राऊत यांनी लिहलेलं पत्र बोलकं आहे - अदित्य ठाकरे
Aditya Thackeray on Sanjay Raut letter : महाराष्ट्र राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मोठा दबाव आणण्यात येत आहे. यासाठी ईडीचा गैरवापर करण्यात येत आहे, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई : Aditya Thackeray on Sanjay Raut letter : महाराष्ट्र राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मोठा दबाव आणण्यात येत आहे. यासाठी ईडीचा गैरवापर करण्यात येत आहे, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबतची तक्रार पत्र लिहून राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांचं पत्रच बोलकं आहे.
'आम्ही भाजप नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाणार नाहीत'
शिवसेना नेते आणि त्यांचे नातेवाईक यांना केंद्रीय संस्थांकडून टार्गेट केले जात आहे, अशी तक्रार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींकडे केली आहे. आम्हाला धमकी दिली जात आहे की, माजी रेल्वेमंत्र्याप्रमाणे तुरूंगात जाल. मात्र, त्यांना सांगू इच्छितो की, ही मुंबई आहे आणि मुंबईची दादा शिवसेना आहे. आम्ही भाजपच्या नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाता येणार नाही. मी ईडी कार्यालयाबरोबर पत्रकार परिषद घेणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Sanjay Raut's serious warning to BJP)
आदित्य ठाकरे यांनी निर्बंधाबाबत केले हे भाष्य
कोविड अद्याप संपलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. त्यामुळे कोविडबाबतचे निर्बंध हळूहळू उठतील. 100 टक्के निर्बंध तेव्हाच कमी होतील. जेव्हा पूर्ण कोविड संपेल. आम्ही काही निर्बंध हळूहळू कमी करतोय. पॅनडेमिकचे इंडिमिक झाल्याशिवाय पूर्ण निर्बंध उठणार नाहीत, असे स्पष्ट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
मुंबईतील 40 ते 44 स्ट्रॉम वाटर ड्रेनेज आहेत. इथे काही तरी व्हावे, अशी मागणी होती. त्यानुसार काम सुरु आहे. तसेच चैत्यभूमीवर येणाऱ्या नागरिकांना मोकळी आणि निवांत बसण्यासाठी जागा हवी होती. म्हणून हे उभारले आहे. याला आपण माता रमाबाई आंबेडकर व्हीविंग डेक असे नाव देत आहोत, असे ते म्हणाले.
आणखी काही ठिकाणी असे डेक उभारु, असे ते म्हणाले. मुंबईच्या बजेटवर टेक्टिकल अर्बनसाठी तरतूद केली आहे. त्यानुसार अशा काही जागांवर असे छान प्रकल्प बनवू. संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारायचे आहे. दालन लवकरच सुरू करायचे आहे. 60 वर्ष होतायत पूर्ण, त्यामुळे टेक्नॉलॉजीचे अँगल आणत आहोत. लढ्यावेळी काय झाले होते, ते त्यावेळेप्रमाणे आपण दृश्यांच्या आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उभारून विद्यार्थ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर भाष्य करण्याचे आदित्य ठाकरे यांनी टाळले. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात आपण काम चांगलं काम करत आहोत. शाश्वत विकास करतोय, तिकडे आपले लक्ष आहे. मुंबईत तसं काहीही नाही, असे ते म्हणाले.