मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढच होताना दिसत आहे. त्यामुळे या धोकादायक विषाणूचा प्रकोप थांबवण्यासाठी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखेर राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. फक्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबईतील पेट्रोल डिलर असोसिएशनने पुढील काही दिवस सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनने आज एक परिपत्रक जारी करत याविषयी माहिती दिली. 


रुग्णवाहिका, फायर ब्रिगेडच्या गाड्या यासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी पेट्रोल पंपावरील कर्मचारी नेहमी तत्पर असतील असं देखील परिपत्रकात मांडण्यात आलं आहे. कोरोनाचा फैलाव रोकण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्ध पातळीवर निर्णय घेताना दिसत आहे. 


पण सरकारच्या निर्णयांना देशातील जनतेकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. रविवारच्या जनता कर्फ्यूला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र आज मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नसल्याचं चित्र दिसत आहे.