मुंबई : कोरोना संकटाला दोन हात करीत असलेल्या आर्थिक राजधानी मुंबईतून दिलासादायक बातमी समोर आली आहे.. शुक्रवारी कोरोनाचा संसर्गदर (Test Positivity Rate) 10 टक्क्यांहून खाली आला आहे.


29 एप्रिल 9.94 टक्के संसर्ग दर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शुक्रवारी सांगितले की, मुंबईतील संसर्गदर 29 एप्रिल रोजी 9.94 टक्के होता. एकूण 43 हजार 525 तपासण्यांमध्ये 4328 रुग्ण पॉझिटिव्ह होते.


85 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं नाही


आयुक्त चहल यांच्या माहितीनुसार, दररोज मुंबईत 44 हजाराहून अधिक तपासण्या होत आहेत. मुंबईतील 85 टक्के लोकांना कोरोनाची लक्षणं नाहीत. रुग्णांचे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाणही कमी होत आहे.


19 एप्रिलपासून TPR मध्ये घसरण


एप्रिल महिन्याच्या सुरूवातील मुंबईचा TPR 20.85 टक्के होता. एप्रिलमध्ये सर्वांत जास्त TPR 3 एप्रिल रोजी नोंद करण्यात आला होता. तो 27.94 टक्के इतका होता.  आज मुंबईतील संसर्ग दर 10 टक्क्यांच्याही खाली आला आहे.


मुंबईतील संसर्ग दर घसरणीचा ट्रेंड कायम राहिल्यास मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळेल. परंतु अद्यापही धोका कमी झालेला नसून मुंबईकरांनी काटेकोरपणे कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करायला हवे.