दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणीही वाढली. मागणी वाढल्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर निर्मिती करणार्‍या कंपन्यांनी नफेखोरी सुरु करुन मास्क आणि सॅनिटायझरचे दर प्रचंड वाढवले. आता हे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांशी चर्चा करून येत्या ७ ते ८ दिवसात याबाबतचा आदेश काढला जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


राज्य सरकारने बाहेर फिरताना मास्क वापरणे बंधनकारक केल्याने तर मास्कची विक्री खूप वाढली आहे. त्यामुळे मास्क उत्पादन करणार्‍या कंपन्यांनी मास्कची किंमत खूप वााढवली असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या दरावर नियंत्रण आणण्याचं ठरवलं आहे. 


यापूर्वी राज्य सरकारने रुग्णवाहिकांच्या दरावर, रुग्णालयातील दरांवर, कोरोनाच्या चाचणीच्या दरावर नियंत्रण आणलं आहे.