कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे :  आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. देवीच्या दर्शनासाठी भक्तांनी मंदिरं फुलू लागली आहेत. नवरात्र उत्सवाचा उत्साह सर्वत्रच पाहायला मिळत आहे. या उत्सवासाठी बाजारातही अनेकांची लगबग दिसतेय.  नवरात्र म्हटलं की गरबा, दांडिया तर आलाच... यंदा गरब्यासाठी यंदा इंडो वेस्टर्न पोशाखाला पसंती मिळताना दिसतेय. भरगच्च नक्षीदार काम असलेले पेहरावच महिलांच्या अधिक पसंतीस उतरताना दिसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केडीया, जॅकेट, थाली घागरा आणि कॉप्र टॉप हा यंदाच्या नवरात्रोत्सवाचा ट्रेण्ड.. केडीया म्हटलं की ते पुरुष वर्गच परिधान करत असे, मात्र यंदा महिला वर्गातही केडीयाची तुफान क्रेझ पाहायला मिळतेय. क्रॉप टॉपमध्येही विविध प्रकार आहेत.


अशा या ट्रेण्डी घागरा, केडीयावर ज्वेलरीही तशीचं ट्रेण्डी असायला हवी, यंदा कपड्यांच्या ज्वेलरीला ग्राहकांची अधिक पंसती मिळत आहे. यंदाचा गरबा इंडो वेस्टर्न लूकने गाजणार असं म्हणण्यास हरकत नाही.