दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : उद्धव ठाकरे सरकार हे लबाड सरकार आहे, हे शेतकऱ्यांशी लबाडी करणारं सरकार आहे. २ लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं या सरकारने म्हटलं होतं, पण असं काहीही झालं नाही, आजही २ लाखाच्या वर ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे, ते शेतकरी आजही कर्जबाजारी आहेत आणि कर्जमाफीची वाट पाहात आहेत, असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ सत्तेचे लचके तोडण्यासाठी सोबत राहिलेलं हे सरकार आहे. हे सरकार नेहमी खोटं बोलत आले आहे. या सरकारने राज्यात पिकविम्याचे निकष बदलले, यामुळे या निकषांचा फायदा हा पिकविमा कंपन्यांना झाला, पण शेतकऱ्यांना झाला नाही. हे धक्कादायक असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


राज्यातला सत्तारुढ पक्ष हा उघडा पडला आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सभागृहाला गंभीरतेने घेतलेलं नाही, सभागृहातील ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भूमिका घ्यावी लागते, पण उद्धव ठाकरे यांनी हे गंभीरतेने घेतलेलं नाही, हे सरकार अधिवेशन चालवू शकत नाही, हे सरकार अधिवेशनात बॅकफूटवर पडलं आहे.