मुंबई : एका 26 वर्षीय महिलेने 29 वर्षीय डॉक्टर सुरेश यादव विरोधात विनयभंग आणि छेडछाड केल्याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतू पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यावरुन आरोपी विरोधात एफआयआर दाखल करता फक्त एनसी लिहून घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित महिलेचा असा आरो़प आहे की, मंगळवारी रात्री डॉक्टर यादवने तिला खूप मारले आणि तिच्या गालावर चावून तिला गंभीर रित्या जखमी केले. त्यानंतर तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


पीडित महिला गंभीर रित्या जखमी झाल्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी डॉक्टरच्या विरोधात फक्त एनसी लिहून घेतली. पीडित महिलेने पोलिसांवर भेदभाव केल्याचा आरो़प करत पुढील तपासणी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.


चारकोप पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, पीडित महिला आणि आरोपीमध्ये मागील वर्षापासून मैत्रीचे संबंध होते. ते दोघेही कांदीवली येथे राहणारे आहेत. शुक्रवारी रात्री, डॉक्टर त्या महिलेच्या घरी गेला आणि त्यांच्यात पैशावरून वाद झाला होता. त्यामुळे आरोपीने पीडितेला खूप मारले आणि तिच्या गालावर चावून तिला गंभीर रित्या जखमी केले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.