कृष्णात पाटील / मुंबई : कोरोनाची (CoronaVirus) मगरमिठीपासून स्वतःची थोडीशी सुटका होतेय असे वाटत असतानाच जगाला सात मोठ्या आजारांचा धोका निर्माण झालाय. 2021मध्ये जगभर पुन्हा भयंकर आजार पसरण्याची शक्यता आहे. या आजारांमुळं जगात हाहाकार माजण्याची भीती आहे.  तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा दिला आहे. 


इबोला  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिका खंडात इबोलाचा (Ebola) विषाणू सापडलाय. हा ताप अंत्यंत प्राणघातक आहे. प्राण्यांपासून माणसांमध्ये हा आजार परसतो. पण WHOच्या दाव्यानुसार तो माणसांमधून माणसांपर्यंत पसरतो. एका आकडेवारीनुसार इबोलाच्या 3400 रुग्णांपैकी 2270 रुग्णांचा मृत्यू झाला होता.


लासा फिव्हर


लासा ताप (Lhasa fever) व्हायरल इन्फेक्शन आहे. लासा तापानं ग्रस्त असलेल्या प्रत्येक पाचव्या व्यक्तीचा मूत्रपिंड, यकृतावर फार वाईट परिणाम होतो. हा आजार आफ्रिकन देशांमध्ये अजूनही तीव्र आहे. शेकडो लोकांना मारलं जात. लासा फिव्हरवर लसही नाही.


मागबर्ग व्हायरल डिसीज


मागबर्ग व्हायरल डिसीज (Magberg Viral Diseaseहा रोग अत्यंत संक्रामक आहे. जिवंत आणि मेलेल्या लोकांच्या संपर्कातून देखील हा पसरतो. 2005 साली युगांडामध्ये या साथीच्या आजाराचा पहिला प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यात 90 टक्के संसर्ग झालेल्या लोकांचा मृत्यू झाला.


मर्स


मर्स (MERS) हा एक अतिशय धोकादायक संसर्ग आहे. या आजाराची भीती कमी झाली असली तरी जगभरात त्याचे प्रमाण वाढण्याची भीती कायम आहे.


सार्स


सार्स (SARS) हा कोविड-19 विषाणूच्या कुटुंबातील विषाणू आहे. 2002मध्ये चीनमध्ये सार्सचा पहिला रुग्ण सापडला होता. 26 देशांमध्ये हा आजार पसरला होता. त्यावेळी 8 हजार लोकांचा सार्सनं मृत्यू झाला होता.



निपाह 


निपाह विषाणू हा गोवर विषाणूशी संबंधित आहे. 2018 मध्ये केरळमध्ये निपाह मोठ्या प्रमाणात पसरला होता. वटवाघुळातून माणसांमध्ये निपाहचा विषाणू पसरला होता.


डिसीज एक्स


डिसीज (Nipah) एक्स हा 2021 मध्ये हा साथीची रोग म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे. काँगोत या रोगाचा विषाणू सापडलाय. या विषाणूमुळं बाधित लोकांपैकी 80 ते 90 टक्के रुग्णांचा मृत्यू होतोय. WHOसुद्धा डिसीज एक्स हा संभाव्य रोग असल्याचं सांगण्यात येत आहे.


जगावर एकामागून एक आजारांचं संकट येऊ घातलंय. त्यामुळं सावध राहा. व्यायाम करा तंदूरुस्त राहा. आरोग्याच्या दृष्टीनं स्वतःची काळजी घ्या.