Maratha vs OBC Reservation :  राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही असा दावा छगन भुजबळांनी (Chhgan Bhujbal) केलाय. सर्वच मराठा आता कुणबीचे प्रमाणपत्र घेत आहेत. त्यामुळे आता सर्वच जणं कुणबी (Kunabi) होणार आहेत असं भुजबळ म्हणालेत. ओबीसी आयोगातील अनेक जणं राजीनामे देत आहेत. त्यामुळे आता ओबीसी आयोगाचा आता मराठा आयोग झाल्याची टीकाही भुजबळांनी केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जरांगेच्या वाक्याचा विपर्यास
मराठा समाजाला (Maratha) 2 दिवस उशिराने मिळाले तरी चालेल. पण सर्वकाही शांततेने करू, असं विधान मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कंल. त्यांच्या या विधानाने ते सरकारला आणखी मुदतवाढ देणार का? अशी चर्चा सुरू झाली. पण त्यानंतर जरांगेंनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा करत आपण 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. 


आरक्षणासंदर्भात बैठक
आरक्षणासंदर्भात यवतमाळमध्ये मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील या बैठकीला उपस्थित होते.आरक्षणासाठी वातावरण दूषित होऊ द्यायचं नाही, कोणाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागणार नाही मात्र आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही घेणारच असं वक्तव्य जरांगेंनी केलं.'आरक्षणावरुन तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असंही ते म्हणाले 


सुप्रिम कोर्टात सुनावणी
राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह पिटीशनवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने 13 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडत आहे. या याचिकेवर मराठा आरक्षणाचं सर्व भवितव्य अवलंबून असणार आहे. सुप्रीम कोर्टात चेंबरमध्ये ही सुनावणी होईल. राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुन्हा पेटलंय. जरांगे पाटील आरक्षणासाठी महाराष्ट्रभर दौरा करताहेत. अशातच आता सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी होणार असल्यानं, सुनावणीकडे मराठा समाजासह राज्याचं लक्ष लागलंय.


दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समिती आज हैदराबाद दौरा करणार आहे. कुणबी-मराठा नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रं देण्यासंदर्भात पुरावे मिळवण्यासाठी शिंदे समितीचा दौरा आहे. तेलंगणामधल्या निजामकालीन कागदपत्रांची तपासणी शिंदे समिती करणार आहे. उर्दू किंवा इतर भाषांमध्ये असलेल्या नोंदी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपतींनी पुढाकार घेतलाय. मराठा आरक्षणासाठी खासदारांनी संसदेत आवाज उठवावा, आरक्षणाबाबत भूमिका मांडावी यासाठी सर्व खासदारांना संभाजीराजेंनी पत्र लिहिलंय .याबाबत दिल्लीत बैठक बोलावण्यात आली असून, खासदारांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय.