मुंबई : मराठा मोर्चामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांच मुंबईकडे येणं सुरु झालं आहे. मोर्चामध्ये बुलडाणा जिल्ह्याला अग्रस्थानी राहण्याचा मान मिळाला आहे. जिल्ह्यातील गायत्री भोसले उद्या या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. वंदनाताई या जिजाऊच्या वेशभूषेत या मोर्चात सहभागी होऊन मोर्चाच्या अग्रस्थानी राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

९ ऑगस्टला काढण्यात येणा-या मराठा मोर्चासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या व्यवस्थापनाची तयारी केली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमधील मोकळ्या जागेत पार्कींगचा व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केल्यानंतर आता मराठा समाजातर्फे राज्याच्या राजधानीत शक्ती प्रदर्शन होणार आहे. 


मुंबईत आयोजित या मोर्चासाठी आता राज्याच्या अनेक भागात लगबग सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागातून मराठा समाजाचे लोकं मुंबईच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास १० लाख लोकं या मोर्चात सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.