मुंबईत कार अपघातात तिघांचा मृत्यू
कार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून यात सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे.
मुंबई : शहरात कार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून यात सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. शुक्रवारी हा भीषण अपघात झाला. बीएमडब्ल्यू कार रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळली. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
कार डिव्हायडरवरून उलटून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाली. कारमध्ये तीन महिलांसह ६ महिन्याच्या बाळाचा समावेश होता. चौघींनाही जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, दोन महिलांसह बाळाचा मृत्यू झाला. तर कार चालवत असलेली महिला गंभीर आहे. ही महिलाही पुण्यात राहत आहे. काल ती मुंबईत आपल्या आईच्या घरी आली होती. आपल्या कारमधून बाहेर जात असताना हा अपघात झाला. चालक महिलेला रूग्णलायातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेय. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.