Maharashtra Politics, मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे(Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group) टेन्शन वाढवणारी घडामोड राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाकरे गटाचे आणखी तीन आमदार फुटून शिंदे गटात(Shinde group) जाणार का अशा चर्चा आता रंगली आहे. कारण, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे(sheetal Mhatre) यांच्या भावाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात या तीन आमदारांनी हजेरी लावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजापूरचे आमदार राजन साळवी, दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू, विधानपरिषदेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे या तिघांच्या हजेरीनं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. शीतल म्हात्रे यांचा भाऊ बंटी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जवळचा समजला जातो. 


रिफायनरीला समर्थन दिल्यावरून सेना नेतृत्व सध्या राजन साळवींवर नाराज आहे. सुषमा अंधारेंना पक्षात ताकद दिली जात असल्यानं मनिषा कायंदे नाराज असल्याची चर्चा आहे. तर शिंदे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकरांचे जवळचे म्हणून सुनिल प्रभू यांची ओळख आहे.


एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह गेले. यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि रातोरात महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर राज्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. राज्यातील सत्ता बदलानंतर शिंदे गटाल मिळणारा पाठिंबा वाढत आहे.