तीन-दोनचा फॉर्म्युला भाजपला अमान्य - रामदास आठवले
महाराष्ट्रात शिवसेना - भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरु केली. त्यात त्यांना यश आले. त्याचवेळी पुन्हा युतीचे सरकार यावे यासाठी महायुतीतील घटक पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तीन-दोनचा नवा फॉर्म्युला मांडला.
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना - भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरु केली. त्यात त्यांना यश आले. त्याचवेळी पुन्हा युतीचे सरकार यावे यासाठी महायुतीतील घटक पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तीन-दोनचा नवा फॉर्म्युला मांडला. तो शिवसेना नेते संजय राऊत यांना सांगितला. तो त्यांना मान्य होता, असा दावा आठवले यांनी केला होता. हाच फॉर्म्युला भाजपसमोर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, आपण हा फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला. त्यांना तो मान्य नाही, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.
दरम्यान, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी अनैसर्गिक असल्याचीही टीका आठवले यांनी केली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ही अनैसर्गिक आघाडी टिकणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वाविरुद्ध ही आघाडी आहे, बाळासाहेबांचे नाव पुढे करून शिवसेना राजकारण करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तर दुसरीकडे तीन-दोनचा फॉर्म्युला भाजप-शिवसेनेने मान्य करावा, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचात आरपीआय नेते रामदास आठवले यांनी उडी घेतली. हा पेच सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, त्यांना यश आले आहे. सत्तेचा एक नवा फॉर्म्युला पुढं आणला. याच माध्यमातून आठवलेंनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षामध्ये नवा पत्ता टाकला होता. अडीच अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युलाच्या पुढे एक पाऊल टाकत आठवलेंनी हा नवा फॉर्म्युला दिला होता. आठवलेंचा हा फॉर्म्युला आहे पाच-तीन-दोनचा फॉर्म्युला होता.
आठवलेंचा तीन-दोनचा फॉर्म्युला
- महाराष्ट्रातलं पाच वर्षांचं मुख्यमंत्रीपद
- त्यातले तीन वर्षं भाजपचा मुख्यमंत्री
- आणि दोन वर्षं शिवसेनेचा मुख्यमंत्री