TMC Recruitment: दहावी उत्तीर्ण असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ठाणे पालिकेअंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. 

 

ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शल्य चिकित्सक, फिजिशियन, भुलतज्ञ, नेत्र शल्य चिकित्स-क, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका/ स्टाफ नर्स, प्रसाविका, बायोमेडिकल इंजिनियर, फिजियोथेरपिस्ट, डायटेशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पिच थेरपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, मेडिकल रेकॉर्ड किपर, सायकॅट्रिक कौन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकॅट्रिक सोशल वर्कर, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, औषध निर्माण अधिकारी, दंत हायजिनिस्ट, सी.एस.एस.डी. सहायक, इलेक्ट्रीशियन, डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल), लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ मुझियम, आरोग्य निरीक्षक, आर्टिस्ट, फोटोग्राफर ही पदे भरली जाणार आहेत.

 

स्त्रीरोग तज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमबीबीएस/एमडी/डीएनबी, ओबीजीवाय, बालरोग तज्ञसाठी उमेदवार एमबीबीएस, एमडी पेड्राटिक्स, शल्य चिकित्सक पदासाठी उमेदवार एमबीबीएस असणे आवश्यक आहे. शल्य चिकित्सक पदासाठी अर्ज करणारे उमेदवार एमबीबीएस, फिजिशियन, भुलतज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार एमबीबीएस असावा. परिचारीका/ स्टाफ नर्स पदासाठी उमेदवार बारावी, दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. बायोमेडिकल इंजिनियर पदासाठी बायोमेडिकल विषयातील पदवीधर अर्ज करु शकतात. फिजियोथेरपिस्टसाठी फिजिओथेरपी विषयातील पदवीधर अर्ज करु शकतात. डायटेशियनसाठी गृह विज्ञान शाखेतील पदवी (होम सायन्स) (फुड अँड न्युट्रिशन विषयासह) असणे आवश्यक आहे. 

 

ऑक्युपेशनल थेरपिस्टसाठी बी.ओ.टी.एच. (ऑक्युपेशनल थेरपी अँड रिहॅबीटेशन) या विषयातील पदवी, स्पिच थेरपिस्टसाठी बॅचरल ऑफ आर्टस (एस.एल.पी.) या विषयातील पदवी, पब्लिक हेल्थ नर्ससाठी जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरी डिप्लोमा असणे आवश्यक आहे. मेडिकल रेकॉर्ड किपरसाठी विज्ञान शाखताल पदवीधर, सायकॅट्रिक पदासाठी क्लिनिकल सायकोलॉजी विषय घेऊन मास्टर ऑफ आर्ट्स,  वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक पदासाठी समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी, सायकॅट्रिक सोशल वर्कर पदासाठी समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे  

 

ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर पदासाठी बारावी आणि संबंधित डिप्लोमा, औषध निर्माण अधिकारी पदासाठी बी फार्म, डेंटल हायजिनिस्ट पदासाठी टेक्निशियन पदवी, डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल) साठी  ग्रंथालय शास्त्राची पदवी, लायब्ररी असिस्टंट पदासाठी विज्ञान शाखेतील पदवी, क्युरेटर ऑफ मुझियम पदासाठी बीएससी, आरोग्य निरीक्षक पदासाठी बीएससी,  आर्टिस्ट पदासाठी फाईन आर्टस् पदवी तर  फोटोग्राफर पदासाठी उमेदवाराकडे कला शाखेचाी पदवी असणे आवश्यक आहे. 

पगार


या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 25 हजार ते 1 लाख 30 हजार रुपयापर्यंत पगार दिला जाणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलाय. 

मुलाखतीची तारीख


यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. ही मुलाख  26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 आणि 01 मार्च 2024 रोजी होणार आहे. उमेदवारांनी वेळेवर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. या तारखेनंतर मुलाखत घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

 

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा