एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा
मुंबईच्या दिशेनं येणा-या एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबल लांब रांगा लागल्या आहेत. खालापूर टोल नाक्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे.
मुंबई : मुंबईच्या दिशेनं येणा-या एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबल लांब रांगा लागल्या आहेत. खालापूर टोल नाक्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे.
शनिवार रविवारचा वीकेन्ड एन्जॉय करुन, मुंबई बाहेर गेलेले मुंबईकर परतीच्या प्रवसाला लागले आहेत. महाबळेश्वर, लोणावळा, खोपोली, या आणि इतर ठिकाणांहून मुंबई, ठाणे, नवी मुंबईतले नागरिक परतू लागले आहेत.
त्यामुळे मुंबईकडे येणा-या मार्गावर वाहनांची संख्या जास्त आहे. परिणामी इथे वाहतूक कोंडी झाली आहे.