मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणाचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या सात तासांपासून इस्टर्न एक्स्प्रेसवर रास्ता रोको सुरू होता. मात्र आता ही वाहतूक कोंडी फुटलीय. पोलिसांशी झालेल्या बैठकीनंतर आंदोलकांनी रास्तारोको मागे घेतलाय. त्यामुळे आता वाहतुकीला सुरूवात झालीय. वाहतूक धिम्या गतीने सुरू झालीय. घाटकोपर, विक्रोळीपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक सुरू झाली असली तरी वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार आहे.  मुलुंड, विक्रोळी, घाटकोपरमध्येही रास्तारोको करण्यात आल्याय. त्यामुळं या भागातही वाहतुकीची कोंडी झालीय.  


कोरेगाव भीमाच्या विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद पडत असून या प्रकरणी   शिव प्रतिष्ठानचे 'संभाजी भिडे यांचे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या संदर्भात पिंपरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले. दंगल भडकविण्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  भारतीय दंड विधान ३९५, ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पुणे महामार्ग आंदोलनकर्त्यांना रस्ता रोको केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पिंपरी पोलिसांनी संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.