मुंबई: देशाच्या आर्थिक राजधानीत गुन्हेगाराला जामीन मिळाल्यानंतर त्याचे भव्य स्वागत (criminal welcome) करण्यात आल्याने पोलीस अडचणीत आले आहेत. गुन्हेगारीची चक्क मिरवणूक वाजत गाजत काढण्यात येत होती. त्यावेळी मुंबईत (Mumbai) रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दहा दिवसानंतर मिरवणूक काढणाऱ्यांवर गुन्हा नोंदवला आहे. तब्बल दहा दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


अनेक पोलीस ठाण्यात डझनभर गुन्हे नोंद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर  कुख्यात गुन्हेगाराचे जोरदार स्वागत करण्यात आले. पाहणाऱ्यांना वाटत होते की, जणू काही मोठे यश मिळवल्यानंतर तो परत आला आहे. तसेच तो समाजसेवक किंवा राजकारणी असेल. ज्याच्यावर लोक प्रेम व्यक्त करीत पुष्पगुच्छा देत हारतुरे घालत होते. मात्र, जेव्हा त्यांना सत्य कळले तेव्हा तेही चकीत झाले. कारण ज्या व्यक्ती स्वागत करण्यात येत होते तो एक व्यावसायिक गुन्हेगार होता. ज्यावर शहरातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे नोंदवले गेला आहेत.


परिसरातील बाबू चड्डीची भीती


 शहाबुद्दीन मुनावर अली इदरीसी तथा ​​बाबू चड्डी असे या व्यक्तीचे नाव आहे. जामिनावर सुटल्याच्या आनंदात व्हिडिओमध्ये दिसणारे लोक त्याचे मित्र आणि नातेवाईक आहेत जे मोठ्या उत्साहाने त्याचे स्वागत करत आहेत. तेदेखील मुंबई शहरात कोरोनासंदर्भात अनेक निर्बंध लागू आहेत. लोक कोरोनामुळे आपल्या घरात नको असताना त्यांच्या घरात बंद आहेत. मात्र, दुसरीकडे नेहमीच्या गुन्हेगाराच्या सन्मानार्थ अशी मिरवणूक निघत असल्याचे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.


या कलमांतर्गत गुन्हा दाखल


समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देवनार पोलिसांनी या व्यक्तीविरोधात भारतीय कायद्यानुसार कलम 188, 269, 34,अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दिवशी पोलिसांनी आरोपींवर योग्य कारवाई का केली नाही, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. याचे उत्तर फक्त पोलीसच देऊ शकतात.