मुंबई : तुम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी 'नो हॉर्न' असा बोर्ड वाचला असेल 'सायलेंट झोन'चा बोर्ड देखील वाचला असेल, त्याचबरोबर तुम्ही 'नो पार्किंग झोन' लिहिलेले देखील पाहिले असेल. पण मुंबईतील बोरिवली परिसरातील अशा प्रकारची एक माहिती लिहिण्यात आली आहे जी वाचुन तुम्हाला थोडे आश्चर्य वाटेल. कारण अशा प्रकारचा माहिती बोर्ड किंवा पट्टी तुम्ही कधीही वाचली नसणार.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोरिवलीच्या जॉगर्स पार्कमध्ये लोकं नेहमीच फिरायला येत असतात. पण इथे फिरायला येणाऱ्या प्रत्येकीची नजर निश्चितपणे एका माहिती बारकडे थांबली आहे. येथे रस्त्यावर पिवळ्या रंगाने "NO KISSING ZONE" असे लिहिले आहे.


मुंबईतील बोरिवली परिसरातील जॉगर्स पार्कजवळ जोडप्यांची खूप गर्दी होत असते. तेथे फिरायला आल्यावर हे कपल नेहमी आपापसात किस्स घेत असतात. हे सगळ पाहून त्या भागातील लोकांना असे वाटू लागले आहे की, याचा परिणाम त्यांच्या मुलांवर किंवा त्यांच्या संस्कृतीवर होत आहे. ज्यामुळे तेथील स्थानिकांनी रस्त्यावर पिवळ्या रंगाने "NO KISSING ZONE"   असे लिहण्याचा निर्णय घेतला आहे. असे केल्यानेतर या कॉलनीतील स्थानिकांचे म्हणणे आहे की, कपल्सचं येथे येऊन चुंबन घेणे आणि मिठी मारणे बंद झाले आहे.


बोरिवलीतील जॉगर्स पार्क हा हायप्रोफाइल लोकांचा परिसर आहे. या परिसरात उद्यान बांधण्यात आले आहे. दररोज प्रेमी या बागेत येतात. एकमेकांना किस्स करतात, मिठी मारतात. यासगळ्यामुळे येथील वसाहतीतील लोकांना आपापल्या बाल्कनीत बसणे हराम वाटत आहे.


ज्यामुळे एक दिवशी कॉलनीतील लोकांची बैठक बोलावली. बैठकीत लोक गंभीरपणे विचार करत होते की, नक्की काय करता येईल, त्यानंतर लोकांनी "NO KISSING ZONE" पट्टी लिहिण्याचा विचार केला. ज्यामुळे काही दिवसातच, अशा जोडप्यांची गर्दी आता थोडी कमी झाली आहे.